⚡दोडामार्ग ता.०९-: शहराच्या बाजारपेठेतील आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरासह तालुक्यातील व बाहेरील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण बाजारपेठ ‘पिंपळेश्वरमय’ झाली होती.
सकाळी वझरे येथील भटजी श्री. दामले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यनारायण महापूजा पार पडली. शुभम अनिल सांबारी व दिक्षिता शुभम सांबारी यांनी यजमानपद भूषविले. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादानंतर भाविकांची नवस व दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
सायंकाळी भजन कार्यक्रम तसेच रात्री आयोजित कोकणी नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…
