जिल्हा बँकेने पार केला सात हजाराचा टप्पा…

एका वर्षात हजार कोटींच्यावर ठेवी:अध्यक्ष मनीष दळवी..

ओरोस ता २
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक ही गेल्या ४२ वर्षापासून जिल्हयातील आर्थिक विकासाची भक्कम पायाभरणा करणारी अग्रगण्य संस्था म्हणून कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता, पारदर्शकता व ग्राहकाभिमुख सेवा या तत्वांवर आधारीत वाटचाल करत बँकेने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

मेल्या ४२ वर्षाच्या कालावधीत बँकेने ग्रामिण व शहरी भागातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, तसेच सर्वसामान्य नागरीकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणेसाठी विविध योजनांद्वारे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल सेवा, तसेच ग्राहकांना सुलभ व तत्पर सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे.

दि.१३ जानेवारी २०२२ रोजी बँकेच्या नव्या संचालक मंडळाने पदभार स्विकारल्यानंतर मा. अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गेल्या पाच वर्षात बँकेने आर्थिक वाढीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतल्यास दि ३१ डिसेंबर २०२१ रोजी बँकेचा एकूण व्यवसाय रु.४२७७.६६ कोटींवरून आज रु.७१७६.२१ कोटींवर पोहोचला आहे. ठेवी रु.२२६३.३० कोटींवरून रु.३९४२.५७कोटींपर्यंत वाढल्या असून, कर्ज वितरण स.२०१४.३६ कोटींवरून रु.३२३३.६४ कोटींवर गेले आहे. निव्वळ नफाही रु.१६.०० कोटींवरून रु.५०.०० कोटींपर्यंत वाढला आहे. एकूणच बँकेच्या ठेवी, कर्जे व एकूण व्यवसायामध्ये गेल्या चार वर्षात दुप्पटीपेक्षा अधिक लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ बँकेच्या सदाम धोरणांची अंमलबजावणी, सुयोग्य नियोजन यामुळे झाली आहे. बँकेला सातत्याने “अ” दर्जा मिळत असल्याने तिची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. बँकेने शेतकरी, उद्योजक, कारागीर, युवक व महिला यांना केंद्रस्थानी ठेवून विविध कर्ज व विकास योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शिक्षणासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिजिटल बँकींग क्षेत्रात बँकेने मोठी झेप घेत १८ शाखा, ४१ एटीएम केंद्रांच्या माध्यमातून आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी “बँक सखी” योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, ही योजना जिल्हयातील सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. यामुळे महिलांना गावपातळीवरच बँकींग सेवा उपलब्ध होणार असून, महिला ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.

याअनुषंगाने बँकेमार्फत प्राथमिक विकास संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि संगणकीकरण प्रक्रियेला मती देण्यासाठी विविध आर्थिक प्रोत्साहन योजना राबविण्यात आल्या आहेत. व्यवस्थापन खर्चासाठी अनुदान, वसुली टक्केवारीनुसार प्रोत्साहन, तसेच संगणकीकरण पूर्ण करणाऱ्या संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्यात आली आहे याचाच परिणाम म्हणून प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरण प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार या योजनांद्वारे संस्थांना लाखो रूपयांची आर्थिक मदत वितरीत करण्यात येत असून, त्यामुळे संस्थांची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होत आहे. याबरोबरच नवउद्योजकांना मार्गदर्शन तसेच ग्रामीण उद्योगांना चालना देणारे उपक्रम राबवून बँकेने जिल्हयाच्या विकासात

महत्वाची भूमिका बजावली आहे.

एकूणच ग्राहकांचा वाढता विश्वास, पारदर्शक सेवा, विविध कर्ज योजनांद्वारे समाजातील सर्व घटाकांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न यामुळे बँकेने आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया निर्माण केला आहे. बँकेच्या व्यवसायात झालेली वाढ ही केवळ आकडयांपुरती मर्यादीत नसून, बँकेच्या स्थैर्य, विश्वासार्हता आणि प्रगतशील दृष्टीकोनाचे प्रतिक आहे. बँकेने आर्थिक प्रगतीसह सामाजिक जबाबदारी पार पाडत विश्वासार्हता निर्माण केली असून, बँकेचे अध्यक्ष महोदय श्री मनीष दळवी यांनी याचे श्रेय बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक वर्ग, संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी/कर्मचारी यांना देत भविष्यातही ही प्रगती अशीच गतीमान ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

७ हजार कोटींचा टप्पा पार; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार आर्थिक झेप
ओरोस, ता. २ :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीत ऐतिहासिक टप्पा गाठत एकूण व्यवसाय तब्बल ७ हजार कोटींच्या पुढे नेला आहे. गेल्या काही वर्षांतील नियोजनबद्ध वाटचाल, पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बँकेने ही उल्लेखनीय भरारी घेतली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दळवी बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक रविंद्र मडगावकर, समीर सावंत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी, ३१ डिसेंबर २०२१ रोजी ४२७७.६६ कोटींवर असलेला बँकेचा एकूण व्यवसाय वाढून वर्षअखेर ७१७६.२१ कोटींवर पोहोचला आहे. ठेवी २२६३.३० कोटींवरून ३९४२.५७ कोटींपर्यंत वाढल्या आहेत. कर्ज वितरणही २०१४.३६ कोटींवरून ३२३३.६४ कोटींपर्यंत पोहोचले आहे. निव्वळ नफ्यातही मोठी झेप घेत ३५ कोटींवरून तो थेट ५० कोटींवर गेला आहे. गेल्या चार वर्षांत सर्वच आर्थिक निर्देशांकात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याने बँकेची आर्थिक ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ४२ वर्षांपासून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या बँकेने ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंग सेवांमध्येही बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे.
१३ जानेवारी २०२२ रोजी नव्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वाखाली बँकेने प्रगतीचा वेग अधिक वाढवला आहे. सुदृढ धोरणे, योग्य नियोजन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे बँकेला सातत्याने “अ” दर्जा मिळत आहे.
शेतकरी, युवक, महिला, कारागीर आणि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शिक्षणासाठी सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १८ शाखा आणि ४१ एटीएम केंद्रांच्या माध्यमातून आधुनिक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी ‘बँक सखी’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून गावपातळीवरच महिलांना बँकिंग सेवा उपलब्ध होत आहे. तसेच प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या बळकटीकरणासाठी व संगणकीकरणासाठी विविध प्रोत्साहन योजना राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे संगणकीकरण प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. एकूणच वाढता ग्राहक विश्वास, पारदर्शक सेवा आणि सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे बँकेने आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया उभारला आहे, अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.

दोन वर्षात दहा हजार कोटींचा टप्पा
या यशाचे श्रेय देताना बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, संचालक मंडळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित करत भविष्यातही ही प्रगती अशीच गतीमान ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच पुढील वर्षी साडेआठ कोटींचा टप्पा तर पुढील दोन आर्थिक वर्षात दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले.

You cannot copy content of this page