शेतकरी चिंतेत:आंबा व काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती..
⚡सावंतवाडी, ता.०२-:
राज्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर सावंतवाडी शहरात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
अचानक कोसळलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत पडले असून आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून वातावरणात लक्षणीय बदल जाणवला.
