मळगाव–वेत्ये रस्त्या परिसरातील काजू बागायतींना आग…

सावंतवाडी : मळगाव–वेत्ये रस्त्या लगत परिसरातील काजू बागायतींना अचानक आग लागल्याने काजू बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत तुळशीदास नाईक, सचिन नाईक तसेच हरमलकर व शिरोडकर यांच्या मालकीची काजू कलमे जळून खाक झाली असून या बायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दुपारच्या वेळी बागायती परिसरातून धुराचे लोट उठताना दिसल्यानंतर काजू बागायतदार तसेच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग वेगाने पसरत असल्याने काजूच्या अनेक कलमांना फटका बसला. नागरिकांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐन काजू हंगामात काजू बागायत जळून खाक झाल्याने हे काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत.नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page