मळगाव घाटीत रस्त्यावर डिझेल सांडल्याने अपघात…

५ ते ६ दुचाकीस्वार किरकोळ जखमी..

सावंतवाडी : सावंतवाडी–रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले आहे. डी. के. टुरिझमच्या ठिकाणापासून ते मुख्य वळणाखालील भागापर्यंत रस्त्यावर हे डिझेल पसरल्याने रस्ता अत्यंत घसरडा बनला आहे. या घसरड्या रस्त्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रस्त्यावर सांडलेले डिझेल वेळेत साफ न केल्याने व रात्रीची वेळ असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, वाहनांचा वेग कमी ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. संबंधित विभागाने हे डिझेल साफ करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page