⚡कणकवली ता.१९-: शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मांडेश्वर / मोरेश्वर मित्र मंडळ, नेरूळ वाघचौडी (कुडाळ) यांच्या सहकार्याने ‘राधानृत्य डोंबाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रुपेश नार्वेकर, सत्यजित पारकर, सौरभ पारकर, नितीन मुरकर, वैभव मालंडकर तसेच ओसरगावचे बबली राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
