विशाल परब व वेदिका परब यांच्या माध्यमातून आयोजन:भक्तांनी आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी, ता.२०-:
श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज शुक्रवार सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात गोव्यातील सुप्रसिद्ध तरुण गायक श्री शुभम नाईक तसेच साई दामोदर भजनी मंडळ, मडगाव यांचे सुमधुर भजन सादर होणार असून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
सदर भजन संध्या ‘विराज मेसॉन’, तिलारी कॉलनी जवळ, चराठे, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून भक्तांनी आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम भाजप युवा नेते श्री विशाल परब तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैदिका परब यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
