नगरसेविका सौ समृध्दी विर्नोडकर यांची नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.१९-:* गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात मुबलक असा पाणी साठा निर्माण झाला असल्याने शहरात पुन्हा एकदा दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा आणि शहर वासियांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेविका सौ समृध्दी विर्नोडकर यांनी नगराध्यक्ष संजू परब आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. येत्या दोन दिवसात हा पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
