कोरोना रुग्णासाठी दत्ता सामंत ठरत आहेत “देवदूत”

ऑक्सीजनसह पुरवित आहेत वैद्यकीय सेवा;मालवणसह जिल्ह्यातील नागरिकांना मिळतोय आधार

मालवण दि प्रतिनिधी कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक संस्था आणि सामाजिक – राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी काम करीत असताना लोकांच्या अडीअडचणीच्यावेळी देवदूताप्रमाणे धावून जाणारे घुमडे गावचे सुपुत्र आणि भाजप प्रदेश सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत कोरोना काळातही रुग्णांसाठी देवदूत बनून काम करीत आहेत. मालवणसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कोणीही संपर्क केला तरी गरजू रुग्णाला ऑक्सीजनसह आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी दत्ता सामंत सदैव तत्पर आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना गोळ्यांचे स्पेशल किट, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना ऑक्सिमिटर, वाफेचे मशीन व अन्य वैद्यकीय सुविधा देताना गरजू रुग्णाना प्रसंगी खाजगी रुग्णालयात स्वखर्चातून सेवा देत आहेत. रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करत, रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी स्वतःची गाडीही सामंत यांनी दिवसरात्र सेवेत ठेवली आहे. सध्यस्थीतीत ६ ऑक्सिजन जम्बो सिलिंडर, २ मिनी सिलिंडर सेवेत असून उद्यापासून चार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर मशीनही सेवेत असतील अशी माहिती दत्ता सामंत यांनी दिली. जिल्ह्यात अनेक रुग्णालयात ऑक्सिजन बेडची अपुरी संख्या लक्षात घेता अत्यावश्यक स्थितीत ज्या रुग्णाला ऑक्सिजनची तात्काळ गरज आहे त्यांना स्वखर्चातून ऑक्सिजन जम्बो सिलिंडर रुग्णालयात उपलब्ध करून दिले जात आहेत. औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांपर्यंत थेट पोहचून त्यांना धीर देण्याचे व त्यांना बळ देण्याचे सेवाकार्य सामंत करत आहेत. दत्ता सामंत यांच्या रूपाने आम्हाला मोठा आधार मिळत असून दत्ता सामंत आमच्यासाठी देवदूत म्हणून उभे राहत आहेत. अश्या भावना अनेक रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. आमडोस गावचे माजी सरपंच दिगंबर नके यांना गंभीर परिस्थितीत आपण रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. आज खंबीरपणे त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहून गावातही जे सेवाकार्य आपण करत आहात. त्याबाबत आम्ही शतशः ऋणी आहोत. अनेक गावातून अश्या भावना व्यक्त होत आहेत. फोटो : आमडोस गावात भेट देऊन रुग्णांची विचारपूस व मदतकार्य करताना दत्ता सामंत.

You cannot copy content of this page