पालकमंत्री या नात्याने आपण चांगले काम करीत आहोत:उदय सामंत
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* कोरोना कालावधीत विरोधी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी टीका करण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने जनतेला दिलासा देण्यासाठी काम करावे. आम्ही देखील पालकमंत्री या नात्याने व आमचे सहकारी आमदार या नात्याने चांगल्याप्रकारे काम करत आहेत. आपापल्या पद्धतीने दोन्ही पक्षाचे नेते जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत असताना नितेश राणे मुख्यमंत्री व महा विकास आघाडी सरकारवर करत असलेली टीका चुकीची आहे. पैसे देऊन जिल्हा परिषद सदस्य फोडण्यापेक्षा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदवर शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यात येईल असा इशारा आमदार नितेश राणे यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
