तौक्ति वादळाच्या नुकसानीची मदत किमान पंचनाम्याएवढी द्यावी

निसर्ग वादळावरुन आ राणेंचा ठाकरें सरकारवर निशाणा

*💫कणकवली दि.१९-:* निसर्ग वादळात सिंधुदुर्गवासीयांना नुकसानभरपाई पोटी 25 कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला, जिल्हा प्रशासनाने निसर्ग वादळात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार 8 कोटी 78 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली पण प्रत्यक्षात ठाकरे सरकारने केवळ 49 लाख 60 कोटी देऊन सिंधुदुर्गवासीयांची फसवणूक केली असा पुराव्यानिशी हल्लाबोल करताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी तौक्ती वादळात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी आता राज्य सरकारने पॅकेज जाहीर करण्यापेक्षा किमान महसूल यंत्रणेने केलेल्या पंचनाम्याइतकी तरी नुकसानभरपाई द्यावी अशी शालजोडी लगावली. सत्ताधारी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक हे सरकारकडून निधी आणण्यात अपयशी ठरले असून नुकसानीची पाहणी केवळ फोटोसेशन साठी करत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी ऑनलाइन प्रेसद्वारे केली. ठाकरे सरकारने निसर्ग वादळ नुकसानीपोटी 25 कोटी देतो असे सांगून सिंधुदुर्गवासीयांना फसवले आहे ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. ठाकरे सरकरच्या या बनवाबनवी ची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देणार असून राज्यपालांकडे याबाबत न्याय मागणार असल्याचेही आमदार नितेश यांनी सांगितले. एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाच तौक्ती वादळात जीवितहानी सह वित्तहानी झाली आहे. 21 मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर तौक्ती वादळाच्या पार्श्वभूमीवर येणार असल्याचे आमदार नितेश म्हणाले. जि.प.अध्यक्ष निवडी वेळी भाजपचे सदस्य फोडण्यासाठी शिवसेनेकडे प्रतिसदस्य 25 लाख रुपये होते ना …मग आता चक्रीवादळा च्या संकटात जनतेला देण्यासाठी पैसे का नाहीत ? असा खडा सवालही आमदार नितेश यांनी केला.

You cannot copy content of this page