विकासावर लढतोय विकासालाच जनता साथ देणार…

संदीप गावडे: लोकसभा विधानसभा प्रमाणे याही निवडणुकीत विरोधकांना जनता नाकारणार..

⚡सावंतवाडी ता.०७-: “मी आतापर्यंत कोणावरही टीकाटिप्पणी केलेली नाही. शेवटपर्यंत विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढलो असून जनता विकासालाच साथ देईल,” असा विश्वास तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, “विरोधकांकडे कोणतेही ठोस विकासाचे मुद्दे नाहीत. त्यांनी शेवटपर्यंत फक्त टीकाटिप्पणी आणि लोकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम केले. त्यामुळे अशा लोकांना जनतेने लोकसभेत नाकारले, विधानसभेतही नाकारले आणि याही निवडणुकीत त्यांना विरोधातच बसवेल,” असा टोला त्यांनी लगावला.

You cannot copy content of this page