विशाल परब: बुथ वर दिली भेट..
सावंतवाडी ता.०७-: तळवडा मतदारसंघात सकाळपासूनच तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उमेदवार संदीप गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा दावा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केला. तळवडा मतदारसंघातील भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, आज काहींनी बंडखोरी केली तरी त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपच्या माध्यमातून झालेली विकासकामे पाहता जनता शंभर टक्के आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.
