सावंतवाडी ता.७-: सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका येथील फॉरेस्ट ऑफिससमोर असलेल्या बंद घराला आज मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला तात्काळ पाचारण करण्यात आले.
घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
