बांद्यात मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड, १५ मिनिटे मतदान थांबले…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील सटमटवाडी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक लाल लाईट दिसून आल्याने सुमारे १५ मिनिटांसाठी मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर तातडीने दुसरी मशीन बसवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्याची माहिती तलाठी फिरोज खान यांनी दिली.
दरम्यान बदलण्यात आलेल्या मशीनमध्ये १६ मतदारांनी मतदान केल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 13 पुरुष व 3 स्त्री मतदारांनी मतदान केले होते. या घटनेवर मनसेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी आक्षेप घेत मतदानासाठी सायंकाळी अर्धा तास वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी नियमांनुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात उपस्थित असणाऱ्या मतदारांना मतदान करू दिले जाईल, अशी माहिती दिली.
दरम्यान पुढील मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

You cannot copy content of this page