माटणे मतदारसंघातील जनता दीपक गवस यांच्या पाठीशीच उभी राहणार…

विशाल परब यांचा विश्वास:माटणे मतदारसंघातील बूथवर दिली भेट..

दोडामार्ग ता.०७-: माटणे मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न दीपक गवस विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम मार्गी लावतील, असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. ते येथील बूथला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी ते म्हणाले, दोडामार्ग हा गोव्याच्या सीमेवरील भाग असून आज अनेक तरुण रोजगारासाठी गोव्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. ही परिस्थिती थांबली पाहिजे. त्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून येथील आढळी एमआयडीसीमध्ये चांगले उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी दीपक गवस यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहणे अपेक्षित आहे.
माटणे मतदारसंघातील जनता दीपक गवस यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वासही श्री. परब यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page