पहिल्या दोन तासांत १० टक्केच्यावर मतदान..

ओरोस ता ७
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार आणि पंचायत समितीच्या त्र्याऐंशी जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात पाच लाख 61 हजार 105 मतदार निश्चित झालेले आहेत.
दरम्यान सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 59 हजार 726 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या 10.64 टक्के एवढे मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान देवगड तालुक्यात 11.53 टक्के झाले आहे. त्या पाठोपाठ वैभववाडी तालुक्यात 11.30 टक्के कणकवली तालुक्यात 11.18 टक्के सावंतवाडी तालुक्यात 11.11 टक्के दरामात तालुक्यात 9.94 टक्के असे मतदान झाले आहे तर वेंगुर्णी तालुक्यात 9.98 टक्के आणि सर्वात कमी मालवण तालुक्यात 9.29 टक्के मतदान झाले आहे.

You cannot copy content of this page