नगराध्यक्ष दिलीप गिरप:रा. कृ. पाटकर हायस्कुलचे पारितोषिक वितरण उत्साहात..
⚡वेंगुर्ला ता.३१-: आज विद्यार्थ्यांच्या विकासासाठीच शिक्षणपद्धती अस्तित्वात आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक व सकारात्मक राहून उच्च शिक्षण घ्यावे व स्वतः चे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे. आज येथील प्रशालेच्या इमारत व इतर मूलभूत गरजासाठी समाजातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळेच्या उन्नतीसाठी आपले निश्चितच सहकार्य राहील, असे प्रतिपादन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज बुधवारी (दि. 31) वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला तालुक्यातील
रा. कृ. पाटकर हायस्कुल आणि रा. सी. रेगे ज्यू. कॉलेज, तंत्र व व्यवसाय विभाग वेंगुर्ला चे वार्षिक पारितोषिक वितरण आज बुधवारी वेंगुर्ला नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी श्री. गिरप बोलत होते. यावेळी त्यांनी एल. पी. स्पोर्ट्स चे साहित्य हायस्कुलसाठी मोफत देण्याचे जाहीर केले. व्यासपीठावर किरण कुबल, बाबुराव खवणेकर, नवनिर्वाचित नगरसेवक सुहास गवंडळकर, रवी शिरसाट, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, गौरी माईणकर, लीना म्हापणकर, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, रिया केरकर, काजल कुबल
भाजपा जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, मुख्याध्यापक सुशांत धुरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक माडकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रीतम ओगले, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, जी. टी. बागुल, सविता जाधव, समिर पेडणेकर, समृद्धी पिळणकर, शाळा मुख्यमंत्री प्रथम बेस्ता, सांस्कृतिक मंत्री मकरंद वेंगुर्लेकर, सदस्य तांडेल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन दिलीप गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी झंकार हस्तलिखिताचे प्रकाशन दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात 8 वि ते 12 वि पर्यंतच्या विविध स्पर्धा परीक्षामधील विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुशांत धुरी यांच्या हस्ते नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुराव खवणेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून घर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
एसएससी बोर्ड परीक्षा सन 2024 -25 : प्रथम क्रमांक
नवनीत आत्माराम मठकर, द्वितीय क्रमांक
प्रसन्न गोपाळ दाभोलकर,
तृतीय क्रमांक
काशिनाथ सुधीर मालवणकर.
बारावी कला विभाग :
प्रथम क्रमांक
पारस प्रसाद केरकर,
द्वितीय क्रमांक
नदाफ फारुख मोहम्मद, तृतीय क्रमांक
अरमान असद मकानदार. बारावी वाणिज्य :
प्रथम क्रमांक
ओमकार शामसुंदर म्हारव, द्वितीय क्रमांक धनश्री मिलिंद निकम,
तृतीय क्रमांक
साध्वी अनंत मिंडे.
बारावी व्यवसाय अभ्यासक्रम : प्रथम क्रमांक
जान्हवी दिलीप बांदवलकर,
द्वितीय क्रमांक
पराग प्रदीप कांबळी,
तृतीय क्रमांक नारायण राजन मुणगेकर.
इयत्ता आठवी :
प्रथम क्रमांक श्रीपाद ओगले, द्वितीय क्रमांक निधी अजित वेंगुर्लेकर,
तृतीय क्रमांक वरदा सुशांत वेंगुर्लेकर.
इयत्ता नववी :
प्रथम क्रमांक दूर्वा महेश गावकर,
द्वितीय क्रमांक रीशीता संदीप बोवलेकर,
तृतीय क्रमांक पूर्वा बाळकृष्ण खोत.
अकरावी कला : प्रथम क्रमांक सुमित मंगेश निंबळकर, द्वितीय क्रमांक उमेश उदय साळकर, तृतीय क्रमांक ओम देऊ नाईक.
अकरावी वाणिज्य : प्रथम क्रमांक करण लक्ष्मण करगुटकर, द्वितीय क्रमांक नेहा सुगंधा कामत, तृतीय क्रमांक मानसी आत्माराम सावंत.
अकरावी व्यवसाय अभ्यासक्रम : प्रथम क्रमांक वैभव सज्जन राऊळ, द्वितीय क्रमांक शंकर रामचंद्र मुननकर, तृतीय क्रमांक सखाराम हनुमंत वरक. मनोहर साबाजी गिरप रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ला चे (माजी विद्यार्थी ) यांस कडून एसएससी आणि एचएससी बोर्ड परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकांना एकूण १० हजार ५०० रुपयांचे बक्षीस वितरित झाले. मीना विनायक फाटक उर्फ निर्मला नारायण परांजपे यांनी कायम ठेव म्हणून दोन लाख रकमेच्या मधून प्रशालेतील हुशार होतकरू भविष्यात शिक्षणाची तीव्र इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यास प्रोत्साहन पर पारितोषिक.तसेच नलिनी दत्तात्रय वेटे यांनी एक लाखाची कायम ठेव ठेवण्यात आली आहे. इयत्ता दहावी मधून वैष्णवी नारायण पडवळ. बारावी संयुक्त मधून कुमारी नेहा सुगंध कामत. बारावी एमसीवीसी मधून
शंकर रामचंद्र मुननकर. इयत्ता आठवी सोहम दयानंद कदम.
इयत्ता नववी दृष्टी प्रशांत मयेकर.
अकरावी संयुक्त भावना भगवान पेडणेकर.
अकरावी एमसीवीसी मधून हर्ष सुभाष मिस्त्री.तसेच डॉ. प्रा. दिपाली चंद्रकांत काजरेकर यांच्याकडून त्यांची बहिण आदर्श शिक्षिका यशवंती विश्राम सावंत यांचे स्मरणार्थ इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात प्रथम विद्यार्थ्यांस पारितोषिक मानकरी आर्या प्रवीण गावडे. बेस्ट एनसीसी आर्मी कॅडेट इयत्ता नववी रुचिका प्रमोद गिरप. शालेय स्तरावर रंगवली प्रदर्शन प्रथम क्रमांक सर्वेश विकास मेस्त्री. द्वितीय क्रमांक हिमांशू प्रदीप बागायतकर.
तृतीय क्रमांक मकरंद सुदेश वेंगुर्लेकर.
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सरिता विठ्ठल गोवेकर.
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक दूर्वा महेश गांवकर.इत्यादीना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थी : आदर्श विद्यार्थिनी इ.10 वी पूर्वा बाळकृष्ण खोत.
इ.11वी संयुक्त मधून
कुमारी तनुजा रतन धूरी.अकरावी व्यवसाय अभ्यासक्रम मधून
वैभव सज्जन राऊळ
या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रशालेच्या सेवानिवृत्त शिक्षिका उज्जयिनी नारायण मांजरेकर यांजकडून SSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांस एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमात एकूण 29 हजार 600 रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा खरात व आभार विलास गोसावी यांनी मानले.
