दारू पिऊन वाहन चालविल्यास धडक आणि कडक कारवाई…

PI निसर्ग ओतारी:31st व न्यू इयर च्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस अलर्ट मोडवर..

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने इयर एंडिंग व न्यू इयर च्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व कोस्टल एरियात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या बुधवारी सकाळी 6 वाजता ते सायंकाळी 6 वाजता या मुदतीत ऑपरेशन विजय ही मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.थर्टी फस्टच्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात 3 पोलीस अधिकारी, 17 पोलीस अंमलदार, 7 होमगार्ड इत्यादी बंदोबस्त कोस्टल एरियात लावण्यात आला आहे. पेट्रोलिंग सह पोलीस संशयित हालचालीवर वोच ठेऊन आहेत. समुद्रकिनारी भागात मच्छिमार, सागरी सुरक्षा रक्षक यांना अलर्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही अलर्ट राहून संशयित व्यक्ती अथवा संशयित घटना आढळून आल्यास त्वरित 112 वर कॉल करावा किंवा वेंगुर्ला पोलीस स्थानकाशी संपर्क साधून त्वरित सूचना द्याव्यात.अपघाताचे प्रमाण वाढत असून ट्रिपल सीट वाहने चालवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी मुख्यत : दारू पिऊन वाहन चालवू नयेत. दारू पिऊन स्थितीत वाहन चालवीत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिल्या आहेत.

You cannot copy content of this page