प्रा.हरिभाऊ भिसे यांचे गोंधळ जागरणच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपण्याचं आणि समाज प्रबोधनाचे काम कौतुकास्पद…

भगवान लोके:असलदेत भगवान लोके मित्रमंडळाच्यावतीने गोंधळी कलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सत्कार..

कणकवली :
भवानी मातेच्या गोंधळामध्ये गोंधळ जागरणमधून रात्र जागवणारे गोंधळी बदलत्या काळातही पारंपारिक लोककला जोपासत आहेत. आधुनिकतेचा काळ असताना देखील प्राध्यापक हरिभाऊ भिसे व त्यांचे सहकारी आपली वार्षिके जबाबदारी म्हणून विविध गावांमध्ये गोंधळ उत्सवांमध्ये सहभागी होतात. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद आहे.लोकसंस्कृतीत गोंधळी कलाकार गोंधळ जागरणच्या माध्यमातून बतावणी करत लोककलेचा वारसा जोपासण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या पारंपारिक लोककला जोपासणा-या कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं आपल्या सर्व समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन भगवान लोके मित्रमंडळ – अध्यक्ष , कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.
असलदे येथे शिंदे कुटुंबियांच्या भवानी देवीच्या गोंधळ कार्यक्रमात भगवान लोके मित्रमंडळ व असलदे ग्रामस्थ मित्रमंडळाच्यावतीने पारंपारिक लोककला जोपासणे गोंधळी कलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सत्कार भगवान लोके व गणपत शिंदे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.
भगवान लोके म्हणाले , गोंधळी समाज हा मुळातच कलावंत आहे. या समाजातील कलावंत हा गोंधळ कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कोकणातील वाड्यावस्त्यांवर जावून आपली लोककला गोंधळ जागरण सादर करत असतात. भवानी मातेच्या गोंधळाच्या ठिकाणी रात्रभर त्या गावातील लोकांसमोर गोंधळी भवानी देवीची महती सांगत ओव्या, भारुड कथन केले जाते.
प्रा. हरिभाऊ भिसे म्हणाले , गोंधळी समाजात आम्ही जन्म घेतला. गोंधळांमध्ये पारंपारिक लोककला सादर करण्याची जबाबदारी आमचा गोंधळी समाज करतो. आम्ही देखील जिल्ह्यातील अनेक वार्षिके करत आहोत. असलदे गावात शिंदे , परब कुटुंबियांच्या गोंधळामध्ये आम्ही गोंधळ जागरण करतो , त्यामुळे ही कला जोपासण्याचे काम आमची पिढी करत आहे. भगवान लोके मित्रमंडळाच्यावतीने झालेला सत्कार म्हणजे आमच्या कलेला एकप्रकारे प्रोत्साहन देणार आहे. गावासाठी भगवान लोके यांच्या रुपाने धडाडीचे नेतृत्व मिळालेलं आहे. त्याला जपण्याचे काम करा .
यावेळी उपसरपंच सचिन परब , माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , बुवा आत्माराम घाडी , महेश लोके , सत्यवान शिंदे , प्रकाश शिंदे , दिनेश शिंदे , दीपक शिंदे , सचिन शिंदे , मिलींद तांबे , अमित मांडवकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो –

You cannot copy content of this page