⚡कुडाळ ता.२३-: येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे आज कायदेविषक शिबीर व हुंडा, जातीभेद व स्त्रीभ्रुण हत्या या वाईट गोष्टींचे दुष्परीणाम आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी शालेय मुलांची रॅली काढण्यात आली. कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बॅ नाथ पै विदयालय कुडाळचे मुख्याध्यापक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षेतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात वकील राजीव बिले, सुरेंद्र मळगांवकर, अमीत सावंत, श्रीमती राजश्री नाईक, श्रीमती कविता खोचरे उपस्थित होते. या कार्यक्रमात वकील श्रीमती राजश्री नाईक यांनी हुंडा, जातीभेद व स्त्रीभ्रुण हत्या या समाजातील वाईट गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. तसेच वकील राजीव बिले यांनी बालकांचे लैगीक अत्याचार संरक्षण अधिनियम कायदयाबाबत मार्गदर्शन केले.
हुंडा, जातीभेद व स्त्रीभ्रुण हत्या या वाईट गोष्टींचे दुष्परीणाम आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी मुलांची रॅलीची सुरुवात बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथून मार्गस्थ झाली. ही रॅली कुडाळ देसाई वाचनालय, ओटवणेकर तिठा, बाजारपेठ, शिवाजी चौक, दैवज्ञ भवन मार्गे बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे समाप्त झाली.
या रॅलीमध्ये वकील राजीव बिले, सुरेंद्र मळगांवकर, अमीत सावंत, राजश्री नाईक कविता खोचरे, विधी स्वंयसेवक मंगेश अडसुळ, वत्सला मणचेकर, प्राची परब, वैभवी तोंडवळकर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन आर.टी.आरेकर, वरीष्ठ लिपीक व जे.के.चव्हाण, चपराशी यांनी केले. या कार्यक्रमास २०० ते २५० विदयार्थी व शिक्षक उपस्थत होते .
विधी सेवा समिती आणि वकील संघटनेतर्फे कुडाळात रॅलीचे आयोजन…
