नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा परीट समाजातर्फे जाहीर सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ यांच्यासह समाजातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारावेळी बोलताना दिपाली भालेकर यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानून, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

You cannot copy content of this page