सायंकाळी साडेपाचची घटना: दोन जण गंभीर जखमी..
⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी शहरातील शिरोडानाका येथील सर्वोदय नगर समोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
