⚡मालवण ता.२३-:
शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या वतीने टोपीवाला बोर्डिंग मैदान मालवण तसेच जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दोन दिवसीय आयोजित मालवण तालुका स्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2025 चे उदघाटन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. गेली 27 वर्षे या स्पर्धा होत आहेत.
गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच शाळा व्यवास्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागात महोत्सव संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले. यावेळी स्पर्धा उदघाटन तसेच उपस्थित मान्यवरांचे सत्कार सन्मान करण्यात आले.
मंगळवारी मैदानी स्पर्धा, सांघिक व वैयक्तिक संपन्न झाल्या. तर बुधवारी समुहगान, समुह नृत्य व ज्ञानी मी होणार या स्पर्धा सह बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
फोटो :
मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते कारण्यात आला.
