मडुरा येथील नाबर स्कूलमध्ये उत्साहात बालदिन साजरा…

बांदा/प्रतिनिधी
मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बालदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पं. जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमा पुजानाने झाली.
यावेळी स्थानिक समिती सदस्य सुरेश गावडे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियांका परब, पालक परेश सावंत, मुख्याध्यापिका निती साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका हर्षदा तळवणेकर यांनी केले. तर आभार सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स यांनी मानले. याप्रसंगी सहशिक्षिका मयुरी कासार, स्वरा राठवड यांच्यासह पालक उपस्थित होते. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेण्यात आले.
फोटो:-
मडुरा येथील नाबर स्कुल मध्ये बालदिन साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page