सावंतवाडीत भाजपला मोठा धक्का…

अजय गोंदावळे यांच्यासह भाजपचे युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांचा राजीनामा: थोड्याच वेळात करणार शिंदे शिवसेनेत प्रवेश..

⚡सावंतवाडी, ता.२४-:
सावंतवाडी भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय गोंदावळे, भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर, तसेच पक्षाचे बुथ प्रमुख यांनी आज आपल्या पदांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कार्यकर्ते थोड्याच वेळात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा घडामोडींचा मोठा उलथापालथ करणारा टप्पा मानला जात आहे.

या राजीनाम्यामुळे सावंतवाडीत भाजपची संघटनात्मक शक्ती आणि निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page