बबन साळगावकर यांचा विरोधकांना सवाल:गोव्याच्या दिशेने निघालेल्या पर्यटकांच्या लोंढ्याने शहरात चैतन्य..
⚡सावंतवाडी, ता. २४-:
सातोळी–बावळट मार्ग बंद असल्याने सध्या हजारो वाहने सावंतवाडी शहरातून प्रवास करत आहेत. दिवाळी सुट्टीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याच्या दिशेने रवाना होत असून, दिवसाला तब्बल पाच हजारांहून अधिक वाहने सावंतवाडी शहरातून जात आहेत. त्यामुळे शहरात काही काळासाठी उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, हे चैतन्य कायम ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल का, असा थेट सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान हे पर्यटक प्रामुख्याने पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हैदराबाद आणि बेळगाव या भागांतून गोव्याकडे जात आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहरात हालचालींना अचानक वेग आला असून व्यापारी वर्गालाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
