पक्ष दिल “त्या” उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा…

महेश सारंग यांचे आवाहन:कारिवडे येथे भाजपची तयारी बैठक संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून ज्या उमेदवाराला पक्ष निवडून देईल, त्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी उपस्थित बैठकीत केले. कारिवडे येथे काल भाजपची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, माजी नगरसेवक परिमल नाईक, मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, प्रमोद सावंत, कारीवडे सरपंच, आंबेगाव सरपंच, कुणकेरी उपसरपंच सुनील परब, शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर (कारीवडे) व कृष्णा उर्फ बाळा सावंत (कुणकेरी), तसेच सर्व बुथ अध्यक्ष, महिला मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुस्कर, प्रमुख पदाधिकारी केशव साहिल बाळा गावकर, विकास संस्थांचे चेअरमन आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांनी बैठकांचं नियोजन करावे असे आवाहन यावेळी सारंग यांनी केले.

You cannot copy content of this page