पेंडूर गावचे माजी सरपंच स्व. संजय नाईक यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण व प्रेरणा स्थळाचे उद्या लोकार्पण…

⚡मालवण ता.०७-: पेंडूर गावचे माजी सरपंच आणि कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक स्व. संजय नाईक यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण व प्रेरणा स्थळाचे लोकार्पण शनिवार दिनांक ८ मार्च, २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वा. संजय नाईक्त प्रेरणास्थळ, नाईक वाडी, पेंडूर मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पद्मश्री श्री परशुराम गंगावणे हे उपस्थित राहणार असून मुख्य अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार श्री. रवींद्र चव्हाण आमदार श्री डॉ. निलेश राणे उद्योजक श्री. दत्ता सामंत
हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. महेश नाईक हे भूषविणार आहेत
या कार्यक्रमास खराडे-पेंडूर सरपंच
श्रीम. नेहा परब, पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष
श्री. दिलीप (दीपा) सावंत, माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर अध्यक्ष श्री. बाबाराव राणे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्तेश्री. एम. के. गावडे, कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ माजी जिल्हाध्यक्ष श्री. मामा माडये, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. संदीप कदम,शिक्षक भारती संघटना सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर
पेंडूर दुग्ध व्यवसायिक सहकारी सोसायटी अध्यक्ष श्री. दीपक गावडे अॅड. श्री. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्ट पेंडूर अध्यक्ष श्री. शिवराम सावंत पटेल डॉ. बापू परब सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री. वामन तर्फे, बॅ. नाथ, पै. सेवांगण कट्टा कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे वराडकर हायस्कूल कट्टा शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर आदी व इतर उपस्थित राहणार आहेत तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आहे आहे

You cannot copy content of this page