आंगणेवाडी भराडी देवी दर्शन वेळेत बदल…

⚡मालवण ता.०७-:
आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या श्री देवी भराडी मंदिरात भाविकांसाठी आंगणे कुटुंबियांतर्फे दर्शनाचे वर्षभरासाठीचे वेळापत्रक व ओटीचा प्रकार जाहीर करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपासून मंदिरात दर्शन सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंतच देण्यात येईल. त्यानंतर मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. नारळ, तांदूळ, खण, हळद, पिंजर या पदार्थांचा ओटीमध्ये स्वीकार केला जाईल. सोबत-अगरबत्ती, फुले, पेढे, साखर, गुळ या पदार्थांचा समावेश भाविक करू शकतात. देवीला साडी-चोळी अर्पण करणे पुढील यात्रोत्सवापर्यंत बंद करण्यात आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या यात्रे दिवशीपासून पाच दिवस साडी-चोळीचा नवस फेडता येईल. देवदिवाळीपासून ते यात्रेच्या दिवसापर्यंत ओटी भरणेचे सर्व प्रकार धार्मिक विधीसाठी पूर्णपणे बंद केले जातील. वर्षभरात येणारे सण यादिवशीसुद्धा त्या दिवसापुरते ओटी भरणे धार्मिक विधीसाठी बंद राहील. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page