⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव चिपटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये आज वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी मुलांना जेवण करण्यासाठीं डायनिंग टेबल व प्लास्टिकच्या खुर्च्या सुपूर्त केल्या आहेत.
दरम्यान याबाबत शाळेच्या शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी उपस्थित सुनील गावडे, विष्णू गावडे, संदीप गावडे,शेखर खांबल, संतोष गावडे,समीर गावडे, लवू गावडे, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
