Headlines

१९ ते २६ जानेवारी या कालावधीत हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

⚡देवगड ता.१७-:
हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून १९ व २६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ रोजी सकाळी ७ वा. फास्ट सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा खुल्या गटात दाभोळ तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर, तर शालेय गटात खाकशी तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर होणार आहे. खुल्या गटातील प्रथम क्रमांक १ हजार , द्वितीय क्रमांक , ७०० रू. व चषक, तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ३०० रू. असे बक्षीस देण्यात येणार आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांकास रुपये ७०० , द्वितीय क्रमांकांस रुपये ५००. व चषक तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना २०० रू. चे बक्षीस देण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ९ वा. पुरुष व महिला गटात वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत. पुरुष गटात १००/ २००/ ४०० मी. धावणे व लांबउडी, गोळाफेक अशा स्पर्धा होणार आहेत. महिला गटात १००/ २००/ ४०० मी. धावणे, लांबउडी व गोळाफेक अशा स्पर्धा होणार आहेत. २६ रोजी दुपारी ३ वा. येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे खुल्या गटात शुटींग हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. यातील प्रथम क्रमाकास ८ हजार, व द्वितीय क्रमांकांस ६ हजार रू. व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी २ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांनी १८ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. तर हॉलिबॉल स्पर्धेसाठी २४ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरण २६ रोजी सायंकाळी ६ वा. शेठ म. ग. हायस्कूल येथे होणार आहे. स्पर्धांसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दोस्ताना सायकल मार्ट (९४२२५८४६६५) व विनय प्रिंटर्स (९८६०९२६५६७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page