डिगस गावात १५ वानर जेरबंद…

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून कारवाई:आ राणे यांच्या अधिवेशनातील प्रश्नाची दखल ..

ओरोस ता १६
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला होता. याची दखल घेत आजपर्यंत किमान १२०० पेक्षा जास्त माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले. या धर्तीवर गुरुवारी १६ जानेवारी रोजी कुडाळ तालुक्याच्या डिगस गावातील गावठणवाडी येथे प्रथमच माकड पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. १५ वानर पकडुन त्यांना जंगल भागात सोडण्यात आले.
डिगस गावातील गावठणवाडी येथील शंभू पवार, सोमदत्त पवार, रुपेश पवार व जयेश पवार यांच्या घराशेजारी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी डिगस उपसरपंच मनोज पाताडे, ग्रामस्थ सुजन पावसकर, महेश शेडगे उपस्थित होते. वनविभाग सावंतवाडी व वनपरीक्षेत्र कडावल अंतर्गत वनक्षेत्रपाल श्री. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग जलद बचाव पथकाचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, दिवाकर बांबर्डेकर, प्रसाद गावडे यांनी मोहीम राबवून एकूण १५ माकडं पकले.

फोटो ओळ:- डिगस:-

You cannot copy content of this page