शरदचंद्र पवार यांच्या स्वनिधीतून संगणक प्रदान…!

⚡वेंगुर्ला ता.१७-: खासदार शरदचंद्र पवार यांच्या स्वनिधीतून प्राप्त झालेले संगणक कुलबवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेस प्रदान करण्यात आले.

  शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेंगुर्ला कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेस सहा संगणकांची मागणी केली होती. त्यानुसार प्राप्त झालेले   संगणक १५ जानेवारी रोजी शाळेच्या मुख्याध्यापक प्रतिमा पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल, राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ला शहर प्रभारी अध्यक्ष स्वप्निल रावळ, ज्येष्ठ नागरिक शेखर वेंगुर्लेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेश मांजरेकर, उपाध्यक्ष आरती नेरुरकर, शिक्षिका मुग्धा कनयाळकर, माता संघाच्या अध्यक्ष अनुक्षा राजापूरकर, अंगणवाडी सेविका अश्विनी पालव, सागर रेडकर यांसह शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व शिक्षक पालक संघाचे सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या या संगणकांचा उपयोग मुलांना घडविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करावे असे नम्रता कुबल यांनी सांगितले.
You cannot copy content of this page