डि.के. सुतार:विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे निवेदन सादर..
⚡वैभववाडी ता.३१-: वैभववाडी तालुक्यातील मानव विकास एसटी बस शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डि.के. सुतार यांनी विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील शाळा महाविद्यालयाच्या विधार्त्यांसाठी मानव विकास योजनेतुन एस टी बस सेवा सुरु आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी पडली असून त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या मानव विकासच्या एसटी बस बंद करू नये. या एसटी बसने विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करीत असतात. वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणासाठी एसटी बस हेच प्रमुख साधन असल्यामुळे व सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन मानव विकास बस सेवा सुरू ठेवण्यात यावी. असे विनंती या निवेदनाद्वारे सुतार यांनी केली आहे
