सावंतवाडीत ट्रेन चुकल्याने उभा होता रस्त्यावर:वाहनावर किंवा व्यक्तीवर हल्ला न केल्याचे पोलीस तपासात उघड…
⚡सावंतवाडी ता.३१-: ‘कथित हल्ला ‘ प्रकरणाच्या तक्रारीनंतर बुधवारी मध्यरात्री निरवडे येथून एका परप्रांतिय युवकाला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत सदरचा युवक हा चिरेखाणीवर कामाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संजय जेहु गोप (वय ३२ वर्षे, रा.कुटसी, कलिगा, गुमला, झारखंड ) असे त्याचे नाव आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकात काही कारणाने उतरल्यानंतर गाडी चुकल्याने कणकवलीत जाण्यासाठी तो रस्त्यावर उभा असल्याची माहिती त्याने पोलीस चौकशीत दिली. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
