Headlines

अपर पोलीस अधीक्षक रावले यांना केंद्रीय गृह विभागाच्या दक्षता अवॉर्ड…

तपासात उत्तम कामगिरीची दखल:
देशातील १०७ अधिकारी, कर्मचारी यांच्यात समावेश..

ओरोस ता ३१
जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा तपासासाठी दक्षता अवॉर्ड २०२४ जाहीर झाला आहे. आज हे अवॉर्ड केंद्र गृह मंत्रालयाचे उपसचिव डी के घोष यांनी जाहीर केले आहेत.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने स्पेशल ऑपरेशन आणि तपास तसेच फॉरेन्स सायन्स, इंटेलिजन्स या चार विभागासाठी दक्षता अवॉर्ड दिले जातात. त्यानुसार केंद्र गृह मंत्रालयाचे उपसचिव डी के घोष यांनी गुरुवारी २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात स्पेशल ऑपरेशन या दक्षता अवॉर्ड साठी देशभरातील एकूण ३४८ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तपास विभागासाठी १०७ जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे. फॉरेन्स विभागासाठी आठ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, विभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक यांचा यात समावेश आहे. यामध्ये जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना तपास या विभागासाठी अवॉर्ड जाहीर झाला आहे.

फोटो:- कृषीकेश रावले

You cannot copy content of this page