भाजपा प्रवेशावर मंत्री केसरकर यांचा पूर्णविराम: देशातील दोन नंबरचे एलईडी फाउंटन मी सावंतवाडीत करणार..
⚡सावंतवाडी ता.०७-: भाजप पक्षात प्रवेश या अफवा आहेत. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असून त्यांच्या विचाराना प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणूक देखील शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केली.
दरम्यान येत्या काळात सावंतवाडी मतदारसंघातील चेहरा मोहरा बदलणार असून भारतातील दोन नंबरचा एलईडी फाउंटन सावंतवाडीत करणार असल्याचे देखील केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
