मंत्री दिपक केसरकर: विधानसभा मतदारसंघातील ५१ माध्यमिक शाळांना सोलर सिस्टिम वाटप..
⚡सावंतवाडी ता.०७-: राज्यात सर्व शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवली जाणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 शिक्षकांना. टॅब दिले जाणार आहेत तर ती निवासी शाळा सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.दरम्यान सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल येथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 51 माध्यमिक शाळांना. सोलर सिस्टिम उपक्रम चे वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार शंकर कांबळे वामन तर्फे रामचंद्र घावरे. गुरुनाथ पेडणेकर रवींद्र मडगावकर अजय गोंधवळे. संदीप गावडे परीक्षेत मांजरेकर. आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री केसरकर म्हणाले आपण शिक्षण मंत्री म्हणून सर्व योजना राबवले आहेत पंधरा पटसंख्या चा निर्णय घेतला आहे इतिहासात प्रथमच मोठी शिक्षक भरती आपणच केली आहे. आता दहा हजार शिक्षकांच्या भरती लवकरच केल्या जाणार आहेत असे ते म्हणाले यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागातील जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडीच कोटी रुपये खर्च करून सोलर सिस्टिम उपक्रम देण्यात आला आहे शिक्षकांच्या सर्व समस्या अडचणी निश्चितपणे सोडवल्या जात आहेत असे ते म्हणाले
