ॲड.देवदत्त परुळेकर:वाम मार्गाला जाणाऱ्या युवा पिढीला सावरणे आवश्यक बनले..
⚡मालवण ता.०७-:
सधनता वाढत असल्याने मुलांच्या हातात अल्पवयातच पैसा येत आहे. यामुळे पैसा चांगल्या ठिकाणी कसा खर्च करावा याबाबत अनभिज्ञ असणारे युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत.याबाबत प्रत्येकाने सजगता बाळगून वाम मार्गाला जाणाऱ्या युवा पिढीला सावरणे आवश्यक बनले आहे असे प्रतिपादन ॲड. देवदत्त परुळेकर यांनी आचरा येथे बोलताना केले.
वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा. बि. सह. पतसंस्था मर्या. आचरा यांच्या तर्फे दिला जाणारा ” कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार यावर्षी वेंगुर्ला येथील ॲड. देवदत्त परूळेकर वेंगुर्ला यांना जाहीर झाला होता.त्याचे वितरण संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ आणि रोख रू.पाच हजार देवून केले गेले.यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत श्रीमती वैशाली सांबारी, वैभवशाली पतसंस्थेचे व्हा चेअरमन सुरेश हडकर, राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, डॉ प्रमोद कोळंबकर, वामन आचरेकर, संतोष गावकर, पांडूरंग वायंगणकर , दिलिप कावले, कुबल, खोत, ढेकणे,तसेच दौलत राणे राजा जोशी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी परुळेकर यांनी आचरा येथे बॅ नाथ पै सेवांगणची शाखा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करुन पुरस्काराप्रती मिळालेली रक्कम येथील कार्यासाठीच खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला
