गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡देवगड ता.०७-:
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुकुल गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी भवानी मंगल कार्यालय चांदोशी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरावर गोल्ड मेडल प्राप्त शर्वरी तायडे,नम्रता सोनटक्के, स्वरा शिंदे ,जिया मांजरेकर,रिया कारेकर ,संस्कृती चोपडे यांचा

तसेच जिल्हास्तरावर सिल्व्हर मेडल प्राप्त निल वाळके ,स्वरा आवडणकर ,कनिष वाळके,तीर्था मोंडकर ,वेद चव्हाण ,सिया कडू, कविता उमराणी ,आराध्या परब, वेदांत राऊळ,द्रुवी शेडगे ,हिमांशू चव्हाण,सुयश गोलतकर ,साना कांबळे ,रिषभ कोकम ,स्वराली मिराशी,क्षिति सावंत,शार्दूल दळवी स्वरूप लोके तसेच तालुकास्तरावर ब्रॉन्झ मेडल मिळविलेल्या 28 मुलांचा सत्कार करण्यात आला.

यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेठ म. ग. हायस्कूल देवगड माजी मुख्याध्यापक आदरणीय राऊत सर, विषयतज्ञ् श्री. नारायण चव्हाण सर, श्री. संदीप मिराशी सर, श्री. मंगेश कदम सर, सौ. राजश्री मोंडकर मॅडम, श्री. भिडे सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. या परीक्षेच्या प्रमुख आदरणीय सौ. कोमल राऊत मॅडम आणि श्री. दिनेश दळवी सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आदरणीय विवेक कुलकर्णी सर सुंदर सूत्रसंचालन केले तसेच अफरणीय मिराशी सर यांनी वि्यार्थी गुण गौरवासाठी मोफत हॉल उपलब्ध करून दिला… या कार्यक्रमासाठी सर्व मुलांचे पालक उपस्थित होते… शेवटी अलपोपहर देऊन आभारप्रदर्शनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

You cannot copy content of this page