चतुर्थ वर्ष बी.एच.एम.एस.एस. २०१५ अभ्यासक्रम व नविन अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर…

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशिक मार्फत घेतलेल्या चतुर्थ वर्ष बी.एच.एम.एस.एस.२०१५ अभ्यासक्रम व नविन अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यात वेंगुर्ला येथील लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा बी.एच.एम.एस.एस.२०१५ अभ्यासक्रमाचा निकाल ८७.५० टक्के तर नविन अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला.
मेडिसीनचा नविन अभ्यासक्रम व २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. एम.एम.एम.चा नविन अभ्यासक्रम व २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. ऑरगॅनॉन २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. रिपर्टरीचा नविन अभ्यासक्रम व २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. कम्युनिटी मेडिसीन २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल ८३.३३ टक्के लागला.
यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.मोहन जगताप, डॉ.सतिष पाटील, डॉ.रश्मी कार्लेकर, डॉ.दिपाली देसाई, डॉ.श्रीराम हिर्लेकर, डॉ.प्रिया मराठे, डॉ.राखी माधव, डॉ.गोकुळ देसाई, डॉ.पूजा कर्पे, डॉ.समता धुरी यांचे मार्गदर्शन लाभले.
मार्गदर्शक शिक्षकांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ पाटील, सचिव पल्लवी पाटील, ज्येष्ठ संचालक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ.दिनेश तांडेल, सदस्य अमरेंद्र दाभोलकर, प्राचार्य डॉ.के.जी.केळकर, उपप्राचार्य डॉ.मनोज आरोसकर व डॉ.सोनाली सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page