ज्येष्ठ नागरिक संघाचा २७ वर्धापनदिन संपन्न…!

⚡वेंगुर्ला ता.०७-: ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला या संस्थेचा २७वा वर्धापनदिन व ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबर रोजी येथील साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी ज्येष्ठांनी उपयुक्त असे मार्गदर्शन करून ज्येष्ठांच्या काही अडचणी असतील तर अवश्य भेटावे असेही सुचित केले.
यावेळी व्यासपिठावर संघाचे माजी संस्थापक अध्यक्ष रा.पां.जोशी, दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, गटविकास अधिकारी पाटकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अॅड.श्रद्धा बावीस्कर आदी उपस्थित होते. श्री.पाटकर यांनी मार्गदर्शन करून ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. तर अॅड.बाविस्कर यांनी कायदेशिर तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. प्रसन्ना देसाई यांनी ‘वयोश्री‘ योजनेबद्दल माहिती देऊन अर्ज वाटप केले. वर्धापनदिनाचे औचित्य साधून ७५ वर्षे पूर्ण झालेल्या व वैवाहिक जीवनास ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जातो. यावर्षी ७५ वर्षे पूर्ण केलेले प्रकाश रेगे, दिनानाथ नवार यांचा सत्कार केला. प्रकाश रेगे यांनी सत्काराबद्दल आभार मानले. जनार्दन गोडकर, सदानंद तुळसकर, गणेश मेतर, अशोक गवंडे, श्री.कांबळी, रमेश पिगुळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रा.पां.जोशी यांनी संघाच्या कामकाजाबाबत आढावा घेतला. शा.शा.काळे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. खिमजी भानुशाली यांनी उपस्थितांच्या भोजनासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयराम वायंगणकर, कडुलकर, जगदीश तिरपुडे, बांदवलकर व येरागी यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटोओळी – ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page