⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये शिरोडा येथील गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
१०० मीटर धावणे या खेळ प्रकारात प्रतिक नांदोस्कर प्रथम क्रमांक, उंचउडीमध्ये नैतिक नाईक प्रथम क्रमांक, लांब उडीमध्ये सावळाराम नार्वेकर पथम तर उंच उडीत सिद्धी परब दुसरा क्रमांक पटकाविला. या चारही विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणा-या जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चारही स्पर्धकांना क्रीडा शिक्षक राजू चव्हाण तसेच आडेलकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धकांचे हायस्कूलचे मुख्याध्यापक के.डी. पोवार, पर्यवेक्षक मंगेश कांबळी, संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – मैदानी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
मैदानी स्पर्धेत बावडेकर विद्यालयाचे यश…!
