अॅथलेटीक्स गोगटे महाविद्यालयाचे यश…!

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला येथे झालेल्या तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
गोळा फेक स्पर्धेत प्रतिक तांडेल याने प्रथम क्रमांक, उंच उडी व लांब उडीत शंकर रेडकर याने प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणेमध्ये प्रज्योत खरात याने प्रथम क्रमांक तर लांब उडीत खुशी शेलटे दुसरा क्रमांक पटकावला. या चारही विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणा-या जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चारही स्पर्धकांना क्रीडा शिक्षक राजू चव्हाण, आडेलकर सर, आशिष शिरोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धकांचे कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य के.डी.पोवार, पर्यवेक्षक मंगेश कांबळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
फोटोओळी – अॅथलेटीक्समधील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page