न्यू इंग्लिश स्कूलची इंदुजा ठरली वेगवान धावपटू…!

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा नुकत्याच कॅम्प मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.इंदुजा गणपत पेडणेकर हिने १४ वर्षाखालील वयोगटातून १०० मीटर व २०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त पटकावत वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, निलेश मांजरेकर, राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब आणि सर्व पदाधिकारी यांनी महिमा नार्वेकर व मार्गदर्शक शिक्षक बोडेकर या बरोबरच या विद्यार्थ्यांनीच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले.
फोटो – इंदुजा पेडणेकर

You cannot copy content of this page