Headlines

विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप..

⚡सावंतवाडी, ता. ३०-: माजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना विशाल परब यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिनेश सावंत, अजय सावंत, बांदेकर, मेरी फर्नांडिस, सुर्वे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास…

Read More

मेढा येथे वीजपोलाचा शॉक लागून दोन गायींचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज पोलाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीज वितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी मेढा येथील शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील मॉन्टी तारी यांच्या घरानजीक असलेल्या वीज पोलाजवळून दोन गायी जात असताना पोलामध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्याचा…

Read More

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम…

बाबल नांदोसकर:शासनाकडे पाठपुरावा करणार.. ⚡कुडाळ ता.३०-: बांधकाम कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या वतीने बांदा येथे बांधकाम कामगारांसाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत…

Read More

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या पुढाकारातून मोचेमाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटलचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यालय…

Read More

गुरुपौर्णिमा निमित्त भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब यांची गुरुवंदना….

वेंगुर्ला“गुरुपौर्णिमा” दिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या ६५० व्या जयंती निमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक,याद्वारे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.त्या अंतर्गत भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून “गुरुपौर्णिमा” दिवसाचे…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत भविष्यात अधिक चांगले उपक्रम….

श्री. दिलीप गिरप ; रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल’ मध्ये मदर तेरेसा स्कुल प्रथम वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद मार्फत आज बुधवार 29 जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह येथे माझी वसुंधरा अभियान 7. 00 व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत “रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल तयार करणे” या उपक्रमवजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील (इयत्ता आठवी ते दहावी गट…

Read More

रोटरी क्लब मालवणतर्फे विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा…

⚡मालवण ता.२९-:रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून तसेच सेवानिवृत्त शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे काळसे हायस्कुलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच काळसे हायस्कुलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिनी परुळेकर यांचा गुरुवंदना सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कुंभारमाठ येथील ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू व प्रशिक्षक महेश परब यांचाही…

Read More

मालवण देवळी समाज मंडळाचे कार्य आदर्शवत…

देवळी समाज जिल्हा हितवर्धक मंडळाचे पदाधिकारी रमेश नरसुले यांचे प्रतिपादन;मालवण देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधवांचा सत्कार संपन्न.. ⚡मालवण ता.२९-:संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात आज देवळी समाज हितवर्धक मंडळे कार्यरत असून त्याद्वारे आपल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, विविध पदांवर, क्षेत्रात कार्यरत समाज बांधव यांचा सत्कार केला जातो परंतु मागील 19 वर्षे सातत्यपूर्ण हा उपक्रम राबवून…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेमधून एकूण १८ विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून अंतिम निवड करण्यात आली आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही निवड…

Read More

प्रगतशील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांचा गौरव…

⚡मालवण ता.२९-:विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजू नये, अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे, प्रेरणे शिवाय माणूस घडत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान पुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व राज्यशासन पुरस्कार प्राप्त डॉ. उत्तम फोंडेकर यांनी येथे बोलताना केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ…

Read More
You cannot copy content of this page