‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया’…
विशाल परब:गणेशोत्सवाच्या पडद्यामागील सेवाव्रतींचा नागरी सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. गणेशोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. ‘श्री गणेशोत्सव २०२६’ निमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र भाजपा युवा नेते…
