कणकवलीत कनकनगर येथे घरफोडी…
कणकवली : शहरातील कनकनगर येथील शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या समृद्धी मिलींद कोरगांवकर यांचे बंद असलेले घर शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी ८:४५ वा. च्या सुमारास उघडकीस आली आहे. या चोरीत तीन लाख पंधरा रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच किमती गणपतीची मूर्ती अज्ञात चोरट्याने…
