बांद्यात उद्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.०८-:
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा येथील हिंदू एकता मंचच्या वतीने सोमवार, दि. ९ रोजी सकाळी १० वाजता, हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभ येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शिवचरित्राच्या प्रेरणादायी पैलूंवर वक्ते मार्गदर्शन करतील. विशेष आकर्षण म्हणून शहरातील रणरागिणींचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.

सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू एकता मंचच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रप्रेम, स्वराज्य आणि संस्कृती यांचा जागर घडवणारा हा सोहळा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

You cannot copy content of this page